
बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी उद्धव गावडे बिनविरोध
Wednesday, December 8, 2021
Edit
बारामती - बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिल्डर असोसिएशनचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनेलचे उमेदवार उद्धव सोपानराव गावडे यांची बिनविरोध निवड झाली.
उद्धव गावडे यांनी भटक्या विमुक्त जाती/ जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी या जागेतून अर्ज भरला होता. या जागेसाठी एकूण 13 जणांनी अर्ज भरले होते. गावडे सोडुन इतर सर्वांनी आपले अर्ज मागे घेतले. एकमेव गावडे यांचाच अर्ज उरल्याने त्यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.
गावडे हे मूळचे बारामतीतील अशोकनगर येथील रहिवासी आहेत. याअगोदर त्यांनी 5 वर्ष बारामती बँकेचे संचालकपद भूषविले आहे.