-->
गोड साखरेची कडू कहाणी.. आणि झोपडीत पाणी.. ऊसतोड कामगारांच्या मदतीला देवदूत आले धावून....

गोड साखरेची कडू कहाणी.. आणि झोपडीत पाणी.. ऊसतोड कामगारांच्या मदतीला देवदूत आले धावून....

वडगाव निंबाळकर  (प्रतिनिधी सुनील जाधव)

 बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम चालू असताना, निसर्गाने थैमान घातलं आणि अवकाळी पाऊस, थंडी,  यासारख्या अनेक अडचणींना ऊसतोड कामगारांना सामोरे जावे लागते. अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेला ऊसतोड कामगार डोळ्यात पाणी, झोपड्यांमध्ये पाणी,ऊस तोडणी शेतामध्ये पाणी अगदी जेवणाचे हाल झाले होते. सर्व धान्य,किराणा,कपडे भिजून गेले अशावेळी वडगाव निंबाळकर गावातील साळुंके मळा व गायकवाड मळा व इतर ग्रामस्थ देवदूत म्हणून यांच्या पाठीशी उभे राहिले.येथील ग्रामस्थांनी ऊसतोड कामगारांचे दुःख जाणले व वेळीच मदतीचा हातभार लावला.ऊसतोड मजूर यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.साळुंके मळा येथे आज सकाळी ११च्या सुमारास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराजे राजेनिंबाळकर,अभिजीत भैय्या काकडे,शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड फील्डमन राजाभाऊ शिंदे व काळुराम (बंडू )पानसरे यांनी कार्यक्रमात हजेरी लावली. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मा. सरपंच माणिकराव गायकवाड,रवींद्र पवार,काका गायकवाड,दामोदर साळुंके,अमोल गायकवाड,चंद्रकांत जाधव सर, संदीप साळुंके, संदीप जगताप, पोपटराव गायकवाड,किशोर साळुंके,हरिभाऊ साळुंके व साळुंके मळा गायकवाड मळा तरुण शेतीकरी बांधव उपस्थित होते. यावेळी ऊस तोड कामगार यांना अश्रू अनावर झाले, साक्षात देवासारखे धावून आलात. आपली मदत अनमोल आहे.सर्वांचे हात जोडून मनापासून आभार मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article