-->
शेतकरी बांधवांनो! पुढील २ दिवस तुमच्या भागातील वातावरण 'असे' असेल

शेतकरी बांधवांनो! पुढील २ दिवस तुमच्या भागातील वातावरण 'असे' असेल

पुणे : ऐन हिवाळ्यात थंडीची चाहूल सुरू झालेली असतानाच महाराष्ट्रात राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार कर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने (weather forcast) वर्तवली आहे. दरम्यान डिसेंबर महिन्यातील सुरूवातीचे 2 दिवस राज्यातील विविध भागात वातावरण कसे राहील? याबाबत माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे आणि क्रोपटेक यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आली आहे.

पुढील २ दिवसात तुमच्या भागातील वातावरण कसे असेल....

नाशिक(सटाणा, चांदवड, दिंडोरी, कळवण, येवला, निफाड, लासलगांव, सिन्नर) या भागात १ - २ डिसेंबर दरम्यान विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पुणे (बारामती, इंदापूर, बोरी, नारायणगांव, कळंब) या भागात १ - २ डिसेंबर दरम्यान विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सांगली (जत, खानापुर, कवठे महंकाळ, आटपाडी, तासगांव, वाळवा, पलुस, मिरज) या भागात १ - २ डिसेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सोलापुर( अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर सोलापुर, पंढरपुर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ) या भागात १ - २ डिसेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सातारा(फलटण, खटाव, पाटण, महाबळेशवर) या भागात १ - २ डिसेंबर दरम्यान विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

लक्षव्दीप, मालदीवजवळ चक्रीवादाळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. (heavy rain) याठिकाणी सुरु झालेल्या द्रोणीय भागामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात याचा प्रभाव जाणवत आहे. परिणामी कालपासून राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह काही प्रदेशात पाऊस सुरु आहे. मागील २४ तासांपासून या भाागांत पावसाची संततधार आहे. आता पुन्हा एकदा आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र उद्यापासून (गुरुवार) महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशाराही दिला आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article