-->
न्यायासाठी लढणाऱ्या योद्धांचा कोऱ्हाळे बु येथे सत्कार सन्मान सोहळा संपन्न

न्यायासाठी लढणाऱ्या योद्धांचा कोऱ्हाळे बु येथे सत्कार सन्मान सोहळा संपन्न

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु|| येथे बौद्ध युवक संघटना समतानगर व सोन्या बापू खोमणे युवा मंच यांच्या वतीने सत्कारमूर्ती म्हणुन  उस्मानाबाद जिल्ह्यातील जळीत कांडामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे अँड.अमोल सोनवणे साहेब यांची विशेष सरकारी वकील म्हणुन निवड झाल्याबद्दल व श्री.वैभव गीते साहेब यांची अनुसूचित जातीतील पीडित १७ कुटूंबियांचे पुनवर्सन करून न्याय मिळवून दिल्याबद्दल या मान्यवरांचा संघटनेच्या वतीने शाल,श्रीफल,फेटा,पुष्पहार देऊन सत्कार समारंभ करण्यात आला.
         
         यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, अॅड बापूसाहेब शिलवंत, सुनिल भगत, सुनील धिवार, रणजित मोरे, रविंद्र खोमणे, सौ. लताताई नलावडे, नानासाहेब मदने, विश्वास भोसले, योगेश भोसले, हेमंत गडकरी, अनिकेत मोहिते, स्वप्निल खरात, सोमनाथ लोणकर, अमोल गायकवाड, संतोष डुबल, उमेश गायकवाड, संजय साळवे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे आयोजन महेश चव्हाण, प्रतिक चव्हाण, विश्वजित चव्हाण, सोमनाथ जाधव, सोन्याबापू युवा मंच या सर्व युवकांनी केले होते.
  
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेशजी भोसले यांनी केले तर सोमनाथ जाधव यांनी आभार मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article