
निवृत्त शिक्षकांनी गावच्या विकासकामात लक्ष घालावे - प्रमोद काकडे
Saturday, December 4, 2021
Edit
निरा - शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर गावच्या सार्वजनिक विकासकामांत लक्ष घालण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी केले. आहे. पुरंदर तालुक्यातील निरा येथील जि.प. शाळा नं. २ च्या प्रशिक्षीका सौ. शोभा हनुमंत जगताप यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन काकडे बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, यशवंत भोसले शिक्षण संस्थेचे मानद सचिव रमेश भोसले शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सरपंच तेजश्री काकडे, ग्रा.पं. सदस्य अनिल चव्हाण, लांघी साहेब, रुपाली रणवरे, अशोक माळशिकारे हनुमंत गाडेकर, कल्याण जेधे, शुभांगी जाधव, गणेश आगवणे, हमा जगताप उपस्थित होते.
शोभा जगताप यांनी खंडाळा, बारामती, पुरंदर तालुक्यात ३६ वर्ष शिक्षक म्हणून प्रामाणिक नोकरी करून अनेक मुले उच्चशिक्षीत केली त्यातील अनेकजण शासनाच्या मोठ्या हुद्यावर काम करत आहेत याचा आम्हा पदाधिकाऱ्यांना अभिमान असल्याचे काकडे यांनी सांगितले. संध्या गायकवाड, तेजश्री काकडे, अनिल चव्हाण, बाळासो मारणे यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास बारामती व पुरंदर तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शोभा जगताप यांनी सर्वांना स्नेहभोजनाचा लाभ दिला.