-->
पुणे जिल्हा बँकेच्या आखाड्यातून सतीश काकडे यांची माघार

पुणे जिल्हा बँकेच्या आखाड्यातून सतीश काकडे यांची माघार

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. पुणे या बँकेचे संचालक मंडळ निवडणुकीसाठी 'अ' वर्ग सोसायटी प्रतिनिधी या मतदार संघातुन सामाजिक कारणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर माझी व मा.अजितदादा यांची सोमेश्वर कारखान्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यावर दादांनी काही विषय मार्गी लावले आहेत व इतर सर्व विषय मार्गी लावुन देतो असे आश्वासन दिलेले आहे.
          वास्तविक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके बाबत आमच्या काकडे घराण्याची खुप अॅटॅचमेंट आहे. कारण पुणे जिल्हा बँकेच्या स्थापनेमध्ये कै.मुगूटराव आप्पा काकडे व कै. बाबालाल काकडे यांचा सिंहाचा वाटा होता. पुणे जिल्हा बँक म्हणजे खऱ्या अर्थाने सहकाराचा कणा आहे. त्यामुळे मी निवडणुकीचा फॉर्म भरला होता. परंतु पुणे जिल्हा बँक ही जिल्ह्याचा आर्थिक कणा असल्याने त्या बँकेवर प्रतिनिधी म्हणुन मा. अजितदादा सारखा कणखर नेता असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण पाहतो की बऱ्याच जिल्हा बँका सक्षम नेतृत्व नसल्यामुळे अडचणीत गेलेल्या आहेत त्यांच्याकडे शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करण्यासाठी सुध्दा पैसे नाहीत. त्यामुळे मा. अजितदादां सारखा आभ्यासु नेता जर बॅकेमध्ये असेल तर बॅक केव्हाच अडचणीत जाणार नाहीत.
            तरी मी सामाजिक कार्य करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पक्षामध्ये नाही किंवा मी कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी पुणे जिल्हा बँकेसाठी निवडणुक अर्ज भरला नव्हता. मी आत्तापर्यंत पारदर्शक पध्दतीने शेतकऱ्यांसाठी काम करीत आलेलो असुन यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करीत राहणार आहे त्यामुळे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही व आवश्यकताही नाही. तरी मी निवडणुक फॉर्म भरल्यानंतर ज्या मित्रांनी व मतदारांनी फोन करून पाठिंबा दिला त्यासर्वांचे मी आभार मानतो तसेच माझे सुचक व अनुमोदक यांचेही मी आभार मानतो.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article