-->
पुणे जिल्हा बॅंकेवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बिनविरोध

पुणे जिल्हा बॅंकेवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बिनविरोध

कोऱ्हाळे बु : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालक पदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. ‘अ’ वर्ग सोसायटी प्रतिनिधी गटातून बारामतीतून अर्ज दाखल केलेल्या शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे पवार यांचा बॅंकेवर बिनविरोध जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनीही याच गटातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूकीला सामोरे जावे लागणार की ते बिनविरोध होणार याकडे लक्ष लागले होते.
जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची जबाबदारी सोपविलेल्या ज्येष्ठ नरसेवक किरण गुजर यांनी बुधवारी (दि. ८) सकाळी काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जात काकडे यांनी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध संधी मिळाली आहे.

यासंबंधी काकडे म्हणाले, ’सामाजिक कारणांसाठी मी अर्ज दाखल केला होता. पवार यांच्याशी सोमेश्वर कारखान्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यांनी काही प्रश्न मार्गी लावले, बाकीचे मार्गी लावतो असे आश्वासन दिले. वास्तविक जिल्हा बॅंकेशी काकडे घराण्याची पूर्वीपासून जवळीक आहे. बॅंक स्थापनेमध्ये स्व. मुगुटराव काकडे, स्व. बाबालाल काकडे यांचा सिंहाचा वाटा होता. सहकाराचा ही बॅंक कणा आहे. पवार यांच्यासारखा कणखर नेता तेथे असणे गरजेचे असल्याने मी अर्ज मागे घेतला. मी शेतकऱ्यांसाठी काम करतो. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही’.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article