
निवडणूक आली कि आमच्या विरोधकांच्या अंगात येतं; उपमुख्यमंत्र्यांचा टोला
निवडणूक आली की, माळेगावातील आमच्या विरोधकांच्या अंगात येते. विधानसभा असो अथवा माळेगाव कारखाना जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक असो. कोणतीही निवडणूक येथील विरोधकांना काहीतरी मुद्दे काढून जनतेची दिशाभूल करायची असते, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे आणि भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
बारामती तालुक्याच्या राजकारणामध्ये माळेगावला विशेष महत्व आहे. या गावामध्ये पवारसाहेब राहतात. तसेच माळेगाव कारखाना पवार साहेबांचा कारखाना म्हणून ओळखला जातो, असे असले तरी येथील अनेक जणांना धरसोडीचे राजकारण करताना मी पाहिलं आहे. या गावातील विरोधक प्रत्येक निवडणुकीत काहीतरी मुद्दे काढून जनतेची दिशाभूल करतात. अर्थात लोेकशाहीमध्ये त्यांच्या अधिकार आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, माळेगावातील सभेत बोलताना अविनाश भोसले यांनी यंदाच्या निवडणुकीत आम्हाला उमेदवारी मिळेल का? असा प्रश्न केला. त्यावर प्रत्युत्तर म्हणून अजित पवारांनी माळेगावात आम्ही जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच राष्ट्रवादीचे तिकीट देणार आहोत. त्यामुळे जो कार्यकर्ता या निकषांमध्ये बसेल त्याला तिकीट मिळणारचं आहे, असं अजित पवारांनी म्हटलं. माळेगावातील धरसोडीचे राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.