
पुणे जिल्ह्यात ऑनलाईन ई-पीकपाणी लावण्यात बारामती तालुका अग्रेसर - उपजिल्हाधिकारी संजय तेली
Wednesday, December 8, 2021
Edit
मोरगाव: पुणे जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर ऑनलाईन ई - पिकपाणी लावण्यासाठी रजीस्टेशन केले असून बारामती तालुका यामध्ये अग्रक्रमावर असल्याचे प्रतीपादन पुणे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले. ते मोफत डिजीटल सातबारा वाटप प्रसंगी तरडोली ता. बारामती येथे बोलत होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने बारामती तालुक्यातील तरडोली येथे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते मोफत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप करण्यात आले. यावेळी बारामती तालुका तहसीलदार विजय पाटील, मोरगाव मंडल अधीकारी मुळे, गाव कामगार तलाठी श्याम झोडगे, सोमेश्वर सह साखर कारखाना संचालक किसन तांबे, जिल्हा परीषद पुणे स्वच्छता व पाणी पुरवठा समिती निमंत्रित सदस्य हनुमंत भापकर, स्टॅंडींग कमीटी सदस्य मंगेश खताळ, संजय भापकर, कोतवाल संघट्ना तालुकाध्यक्ष संतोष खोमणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
विजय पाटील यांच्या हस्ते डिजिटल स्वाक्षरी सातबाऱ्याचे मोफत वाटप संजय तेली व तहसिलदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तेली त्यांनी सांगितले की, डीजीटल स्वाक्षरी सातबाऱ्यामुळे शेतकऱ्यांना सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयात घालावे लागणारे हेलपाटे वाचण्यास मदत होणार आहे .तसेच प्रत्येक शेतकऱ्यांने स्वतःच्या शेतातील ई-पिक पाणी स्वतः करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले .उपस्थित कार्यक्रम प्रसंगी शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांकडे पाणंद रस्त्यांची मागणी केली. यावेळी तहसीलदार विजय पाटील यांना याबाबत लक्ष पुरवून तात्काळ पाणंद रस्ते खुले करण्याच्या सुचना दिल्या.