
पुणे जिल्हा बँकेसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांचा अर्ज दाखल
Thursday, December 2, 2021
Edit
कोऱ्हाळे बु :- पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे यांचा PDCC बँक वि,जा/भ.ज/वि.मा.प्र. या गटातून निवडणुक निर्णय आधिकारी श्री.मिलिंद सोबले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
या वेळी श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार आबा मोरे, को-हाळे गावचे युवा सरपंच रविंद्र खोमणे, कारखान्याचे संचालक रणजित मोरे, रोहित कदम, तानाजी पानसरे, तानाजी खोमणे उपस्थित होते.