-->
खंडुखैरेवाडी येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

खंडुखैरेवाडी येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

मोरगाव : खंडुखैरेवाडी ता . बारामती येथील  राजे प्रतीष्ठाण संचलीत न्यू इंग्लिश स्कुल व मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने रक्तदान व  नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष दिलीप खैरे  यांनी दिली.
कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. यामुळे  राजे प्रतीष्ठानने  भव्य रक्तदान, नेत्र  व आरोग्य  तपासणी शिबीराचे  आयोजन केले होते.  या शिबीराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती  दिलीप खैरे यांनी केले. यावेळी  संस्थेच्या सचीव मनिषा खैरे, आय टी आय चे प्राचार्य उद्धव वाबळे,  विश्वराज हॉस्पिटल तर्पण ब्लड बँक लोणी काळभोर याचे प्रतिनिधी प्रवीण नवले, सुरेश शितोळे  तसेच   रक्त दाते प्रभाकर भोंडवे, शशिकांत खैरे, शुभम चांदगुडे  आदी  उपस्थित  होते.

या शिबीरासाठी  लोणी काळ्भोर येथिल विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने   तर्पण ब्लड बैंकेने रक्त बॉटलचे   संकलन केले. मोरगाव, सुपे, चांदगुडेवाडी, खंडु खैरेवाडी, आदी परीसरातील तरुण वर्ग व विशेषतः महीलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान  केले. तसेच  शिबीराच्या निमित्ताने  नेत्र तपासणी केल्यानंतर उपस्थित रुग्णांना मोफत चश्मे वाटप करण्यात आले.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article