-->
सोमेश्वरनगर : करंजे येथील शेतकऱ्यांचे विदयुत पंप चोरणारी टोळी वडगांव निंबाळकर पोलीसांनी केली जेरबंद

सोमेश्वरनगर : करंजे येथील शेतकऱ्यांचे विदयुत पंप चोरणारी टोळी वडगांव निंबाळकर पोलीसांनी केली जेरबंद

कोऱ्हाळे बु :- वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत करंजेपुल दुरक्षेत्र हददीतील करंजे गावात गेल्या काही दिवसापासुन विहिरीचे विदयुत पंप चोरी होत असल्याची तक्रारी प्राप्त होत होत्या त्याबाबत १) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ४८४ / २०२१ भादवि ३७९, २) गु.र.न. ४८५/२०२१ भादवि ३७९, प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्याअनुशंगाने करंजेपुल दुरक्षेत्राचा स्टाफ विदयुत पंप चोरटयांचा शोध घेत होता. त्यावेळी सागर सतिश पाटोळे रा करंजे ता बारामती हा त्याचे साथीदारासह विदयुत पंप चोरी करत असल्याची माहीती मिळाली होती. 
             त्यावरून सागर पाटोळे यास ताब्यात घेतले व त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार शेखर सतिश पाटोळे, मयुर नंदकुमार गायकवाड, अल्पवयीन मुलगा सर्व रा करंजे ता बारामती यांचेसह करंजे परिसरात १० विदयुत पंप चोरल्याची कबुली दिली आहे. पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १० पैकी ७ विदयुत पंप मोटारी हस्तगत केल्या असुन, उर्वरित ३ मोटारीचा शोध घेत आहे. 
           
        सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मा. डॉ. अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण पोलीस, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते सो. बारामती विभाग बारामती, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोहवा डी. एस. वारूळे, पोहवा आर. एल नागटिळक, पोहवा एन. के. खेडकर, पोना नितीन बोराडे, पोना सागर देशमाने, पोशि महादेव साळुंखे , पोशि अमोल भुजबळ यांनी केली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article