
थोड्याच दिवसात लोकप्रिय झालेली Web series Money Heist च्या नवीन पार्टची वेळ ठरली; या तारखेला येणार.....
संपूर्ण जग ज्या वेब सीरिजची आतूरतेने वाट पाहत आहे, त्या सर्वांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण वर्ल्ड फेमस मनी हाईस्ट (Money Heist) सीरिज उद्या म्हणजेच 3 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे.
टोकियोचा सीझन 5 च्या पहिल्या व्हॉल्यूममध्ये शेवट होतो. नैरोबीने टीमचा निरोप घेतला. मात्र अजूनही चाहते प्रोफेसर आणि रकैलच्या मास्टर माईंड प्लॅनिंगवर फिदा आहेत. टीम मेंबरला वाचवण्यासाठी टोकियो आपल्या जिवाची बाजी लावते. त्यामध्येच तिचा शेवट झाल्याचं सीझन 5 च्या व्हॉल्यूम एकमध्ये दाखवलं आहे. असं जरी असलं तरी बर्लिन, टोकियो, नैरोबी अशांच्या भूतकाळातील अनेक गोष्टी पुन्हा दाखवण्यात येणार आहेत.
किती वाजता येणार मनी हाईस्ट
सीरिजचा 5 वा सीझन 3 डिसेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार, अशी माहिती होती, मात्र आता ती सीरिज किती वाजता प्रदशित होणार, हेदेखील समोर आलं आहे. 5 व्या सिझनचा दुसरा भाग दुपारी 1.30 वाजता प्रदर्शित होत आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर याआधीचे आणि शेवटचा म्हणजेच 5 व्या भागातला व्हॉल्यूम 2 ही पाहू शकता. 3 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता संपूर्ण देशामध्ये हिंदी, इंग्रजी आणि तामिळमध्ये हे भाग प्रदर्शित होणार आहेत.
सीझन 5 च्या व्हॉल्यूम दोनमध्ये एकूण 5 एपिसोड असणार आहेत. पहिल्या व्हॉल्यूममध्ये 5 एपिसोड्स आणि दुसऱ्या व्हॉल्यूममध्ये 5 एपिसोड म्हणजेच एकूण 10 एपिसोड्सने या मनी हेस्टचा शेवट होणार आहे.
कोणामुळे रंगला शेवटचा सीझन
शेवटच्या सीझनमध्ये टोकियो (उरसुला कॉर्बेरो), प्रोफेसर (अल्वारो मोर्टे), रकैल (इत्जियार इटुनो), लिस्बन (इट्झियार इटुनो), रियो (मिगुएल हेरॅन), डेन्व्हर (जैमे लोरेन्टे), स्टॉकहोम (एस्थर एसेबो), बोगोटा (केयुकेरियन), निजवा पलेर्मो (रॉड्रिगो डे ला सेर्ना), मनिला (बेलेन कुएस्टा) आर्टुरो (एनरिक आर्से), हेलसिंकी (डार्को पेरिक), मार्सेल (लुका पेरोस), कोरोनेल तामायो (फर्नांडो कायो) आणि गांडिया (जोसे मॅन्युएल पोगा) या टीम मेंबर्सने रंगवला होता. मात्र आता व्हॉल्यूम 2 मध्ये यातील अनेक पात्रं आपल्याला दिसणार नाहीत.
बर्लिन पुन्हा येणार?
पहिल्या चोरीमध्ये आपल्या टीमसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा बर्लिन पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. स्पिन-ऑफ शोच्या माध्यमातून बर्लिन म्हणजेच पेड्रो अलोन्सो आंद्रेस डी फोनोलोसा हा पुन्हा 2023 मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सने त्याची अधिकृत घोषणाही केली आहे.