चिंताजनक : बारामतीच्या कोरोनाच्या वाढत्या संख्येवर अजितदादा काय निर्णय घेणार; दादांच्या निर्णयाकडे बारामतीकरांचे लक्ष? आज कोरोना @179 तर काल @170
Wednesday, January 19, 2022
Edit
बारामती: बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतच चालला असून उपमुख्यमंत्री अजित पवार वाढत्या रुग्णसंख्येवर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. शहरात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण अधिक असून त्याला शहरात बाजारपेठेत होणारी गर्दी तर कारणीभूत नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे. पोलिसांच्या वतीने भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बगडा उभारला आहे. एवढं सगळं असताना देखील रुग्णसंख्या वाढतच चालल्याने दादा बारामतीत निर्बंध आणखी कडक करणार का?
सविस्तर आकडेवारी
कालचे शासकीय (18/01/22) एकूण rt-pcr नमुने 283. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-102. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---69 त्यापैकी पॉझिटिव्ह --29-. कालचे एकूण एंटीजन -778. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.48. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 102+29+48=179. शहर-128 ग्रामीण 51. एकूण रूग्णसंख्या-31637 एकूण बरे झालेले रुग्ण-30151. एकूण आज डिस्चार्ज--74 मृत्यू-- 781. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00