
बारामतीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर: कोरोना रुग्णसंख्या एका महिन्यात ५७ पटींनी वाढली; दर तासाला सापडताहेत 7 रुग्ण
Tuesday, January 18, 2022
Edit
बारामती: डिसेंबर महिन्यात १७ तारखेला 3 रुग्ण सापडले होते आज बरोबर एक महिन्यानंतर त्यामध्ये 57 पटींनी वाढ झाली असून आजचा कोरोनाचा आकडा 170 वर जाऊन पोहचला आहे.
सविस्तर आकडेवारीकालचे शासकीय (17/01/22) एकूण rt-pcr नमुने 298. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-85. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---26 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -841. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.74. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 85+11+74=170. शहर-106 ग्रामीण 64. एकूण रूग्णसंख्या-31458 एकूण बरे झालेले रुग्ण-30077. एकूण आज डिस्चार्ज--58 मृत्यू-- 780. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
आरोग्य विभागाचे आवाहन
कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यामुळे याला प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सॅनीटायझर व सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्री बरोबरच कोविड लसीकरण हे अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे कोविड लसीकरण करून घेणे हा कोरोना पासून वाचण्यासाठी रामबाण उपाय ठरत आहे, त्यामुळे बारामतीतील सर्वच नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्या नागरिकांचा पहिला डोस राहिला असेल त्यांनी आपला पहिला डोस व ज्या नागरिकांच्या दुसरा डोस राहिला असेल अशा नागरिकांनी तात्काळ आपला दुसरा डोस नजीकच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन घ्यावा. अजूनही बारामतीमध्ये दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तसेच जर आपण लस घेतली असेल व नोंदणी राहिली असेल तरीसुद्धा तात्काळ नोंदणी करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. जरी कोरोना लसीकरण झाल्यानंतर आपण कोरोना पॉझिटिव्ह आलात तरी कोरोनामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामापासून लसीकरण झाले असल्यामुळे आपला बचाव होतो त्यामुळे प्रत्येकाने न चुकता कोरोना लसीकरण करून घ्यावे,सध्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना लस उपलब्ध आहे .त्याचप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या तसेच शाळाबाह्य म्हणजे शाळेत न जाणाऱ्या मुलांनी देखील कोविड लसीकरण करून घ्यावे