
चोरट्यांनी ATM मशिनच केले गायब; बारामती तालुक्यातील मुर्टी येथील प्रकार
Sunday, January 16, 2022
Edit
मुर्टी ता.बारामती गावात शनिवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एक एटीएम मशीन गायब केले आहे.या घटणेत साधारण दोन ते अडीच लाख रुपये चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळी नुकतीच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याची एक टीम दाखल झाली असून तपास सुरू आहे. मोरगाव -निरा रोडवरील हॉटेल रविराज शेजारी टाटा इंडिकॅश कंपनीचे हे एटीएम मशीन आहे.परवाच एटीएम मशीन मध्ये साधारण तीन लाख रुपये भरण्यात आल्याचे स्थानिक सांगत होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँके पासून हाकेच्या अंतरावर हे एटीएम मुख्य रस्त्यालगत आहे.नेहमीच या मशीन मध्ये पैसे टाकत नसल्याच्या तक्रारी होत्या. परंतु परवाच कॅश टाकली व आज पहाटे चोरी झाली.
एटीएम सुरक्षा रक्षकांचा अभाव व परिसरात सीसीटीव्ही नाहीत
घटना स्थळाच्या जवळपास सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आली नसून पोलिसांना तपासात अडचण निर्माण होणार आहे. एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरा डी व्ही आर मशीन गायब आहे. येथील एटीएम च्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले नाहीत.