
मोरगाव येथे ट्रॅक्टर व कारचा भीषण अपघात; अपघातात बारामती येथील तिघांचा मृत्यू
Wednesday, January 19, 2022
Edit
मोरगाव: कार आणि ट्रॅक्टरच्या धडकेत बारामती शहरातील एकाच कुटूंबातील दोन महिला आणि एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती तालुक्यातील मोरगावनजिक तरडोली येथील खटकळीचे ओढ्यामध्ये बुधवारी रात्री १०.३० वाजता उशीरा हा अपघात झाला.
सौ.अश्विनी श्रेणीक भंडारी, मिलिंद श्रेणीक भंडारी आणि सौ. कविता उदयकुमार शहा अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्री मोरगावनजिक भंडारी कुटुंबीय प्रवास करत असलेल्या कारची आणि एका ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक झाली. या भिषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
बारामतीतील सराफ व्यवसायिक श्रेणीक भंडारी यांच्या पत्नी अश्विनी, मुलगा मिलिंद आणि भगिनी कविता शहा यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर बारामती शहरात हळहळ व्यक्त होत असून भंडारी आणि शहा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.