सोमवार दि.२४ पासून राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार; कॉलेज सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे
कॉलेज सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवणार
महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात प्रत्येक जिल्हाधिका-यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव आम्ही पाठवतोय. त्यांच्या आदेशानंतरच हा निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले.
सोमवारपासून शाळा सुरु होणार
राज्यात ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.