मोरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नेवसे बिनविरोध
Saturday, January 22, 2022
Edit
मोरगाव : मोरगाव ता. बारामती येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदीप लक्ष्मण नेवसे यांची नुकतीच निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली.
मोरगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंच वैशाली पालवे यांचा ठरल्याप्रमाणे निर्धारीत कार्यकाळ पुर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. हा मंजुर झाल्यानंतर या रिक्त पदासाठी निवड प्रकीया नुकतीच पार पडली. ही निवडीसाठी बोलवलेल्या सभेचे अध्यक्ष सरपंच निलेश केदारी होतो. यावेळी सदस्य पोपट तावरे, ग्रामसेवक मोरेश्वर गाडे व इतर सदस्य उपस्थित होते.
उपसरपंच पदासाठी केवळ एकमेव अर्ज आल्याने संदीप ( संतोष ) लक्ष्मण नेवसे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच निलेश केदारी, माजी सरपंच पोपट तावरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी नेवसे यांचा सत्कार करून अभीनंदन केले. यानिवडीनंतर बोलताना नेवसे यांनी सांगितले की, जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ दाखवुन गावातील विकास कामांसाठी पाठपुरावा करणार आहे.