-->
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंह यांची के. बी. कंपनीला सदिच्छा भेट

सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंह यांची के. बी. कंपनीला सदिच्छा भेट

फलटण : सातारा जिल्हाचे जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंह यांनी शनिवार दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी के. बी. एक्सपोर्ट व के. बी. बायो ऑरगॅनिक्स कृषी क्षेत्रातील अनुक्रमे निर्यात व कीटकनाशकांच्या क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कंपन्यांना आपल्या कुटुंबीयांसमवेत भेट दिली. कंपनीचे संचालक श्री. सचिन यादव यांनी यावेळी जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंह स्वागत केले. या भेटीवेळी त्यांनी त्यांचा कृषी क्षेत्राशी असणारा जिव्हाळा तर व्यक्त केलाच त्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांनी देखील जिज्ञासुपणे दोन्ही कंपन्यांची कार्यपद्धती समजून घेतली व संपूर्ण माहिती जाणून घेतली. 
        या भेटीदरम्यान कंपनीच्या सर्व युनिट्सची त्यांनी पाहणी केली यामध्ये सर्व प्रयोगशाळा व त्या अंतर्गत चालणारे काम तसेच संशोधन प्रक्रियेमध्ये कंपनीने केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. कंपनीच्या अद्ययावत प्रयोगशाळांचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी के. बी. बायो ऑरगॅनिक्सने संशोधित केलेल्या कीटकनाशकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या युनिटला देखील भेट दिली आणि तिथे चालणाऱ्या सर्व प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. ‘कृषी क्षेत्रात एका नावीन्यपूर्ण आणि तितक्याच गरजेच्या असणाऱ्या रसायनमुक्त कीटकनाशकांच्या निर्मितीमध्ये एक महत्वाची भूमिका तुम्ही निभावत आहात जी अतिशय उल्लेखनीय असल्याचे त्यांनी कंपनीचे संचालक श्री. सचिन यादव यांच्याशी बोलताना सांगितले’.
        के. बी. बायो ऑरगॅनिक्स कंपनीची माहिती घेतल्यानंतर त्यांना देशातील कृषी निर्यात क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या के. बी. एक्स्पोर्टच्या पॅकहाऊसलाभेट दिली. यादरम्यान बेबीकोर्न, डाळिंब, भेंडी, दुधी भोपळा, कढीपत्ता इत्यादी पिकांच्या निर्यातीच्या प्रक्रियेमधील विविध टप्प्यांमध्ये होणाऱ्या कामाची माहिती त्यांना देण्यात आली. महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकऱ्यांचा कृषीमाल थेट युरोपच्या बाजारपेठेमध्ये अगदी सर्वोत्तम दर्जा राखून व ताज्या अवस्थेमध्ये पोहोचवला जातो याबाबत तसेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची सविस्तर माहिती घेतली तसेच निर्यातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारा उत्तम परतावा आणि कंपनीच्या भागातील लोकांना उपलब्ध झालेला रोजगार याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कंपनीचे संचालक श्री. सचिन यादव यांनी यावेळी जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत संवाद साधला ज्यादरम्यान त्यांनी के. बी. एक्सपोर्ट व के. बी. बायो ऑरगॅनिक्स या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्यातक्षम कृषीमालाचे उत्पादन घेणे व कंपनीच्या माध्यमातून त्याची निर्यात अगदी सहजपणे करणे हे अगदी सहजशक्य झाले आहे याची माहिती दिली. संपूर्ण कंपनीला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंह यांनी समाधान व्यक्त केले आणि कृषी क्षेत्रातील तुमचा प्रगतीचा आलेख असाच उंचावत जावो आणि याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होवो अश्या सदिच्छा व्यक्त केल्या.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article