
इंदापूर: राधिकानगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Wednesday, January 26, 2022
Edit
इंदापूर प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिन भारतीय लोकांच्या स्वातंत्र्याची पहाट, याच दिवशी लोकशाहीला प्रत्येक्षात उतरवणारी स्वतंत्र भारताची राज्य घटना अंमलात आली ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी क्रमांक ४३ येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यात आला.
यावेळी, संविधानाच्या प्रास्ताविकेचे पुजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक अनिकेत दादा वाघ व इंदापूर तालुका महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सायरा भाभी अत्तार यांच्या हस्ते झाले.
तसेच यावेळी नगरसेवक अनिकेत वाघ, सायरा भाभी अत्तार, जेष्ठ शिक्षिका शिवरकर मॅडम, नम्रता ताई घनवट यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अॅड. सुमित वाघमारे यांनी सांभाळली. आभार प्रदर्शन शिक्षिका रूपाली शेलार व सहशिक्षिका योजना वाघमारे मॅडम यांनी केले.
यावेळी सदर कार्यक्रमास हमिदभाई अत्तार, अशोक वाघमारे, अॅड. विनायक म्हेत्रे, प्रदीप गवळी, रणजीत लोखंडे, दिनेश कुमार, आर्चना अनारसे, सुजाता वाघमारे, प्रियंका चितारे व लहान बालकांनी उपस्थिती दर्शवली.