-->
लाटे येथील पुण्यमाता आईसाहेब मंदिरात चोरी; ५८ हजारांचा ऐवज लंपास

लाटे येथील पुण्यमाता आईसाहेब मंदिरात चोरी; ५८ हजारांचा ऐवज लंपास

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील लाटे गावातील प्रसिद्ध असलेल्या पुण्यमाता आईसाहेब मंदिरात गुरुवार दि.13 रोजी पहाटे चोरी झाली आहे.  पुण्यमाता आईसाहेबांचा मुकुट, सोने चांदीचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. मकर संक्रातीच्या तोंडावर मंदिरातील चोरी झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आईसाहेबांचा 13 हजाराचे मुकुट व 45हजारांचे मंगळसूत्र असा मिळुन  ५८ हजारांचा ऐवज मंदिरातील चोरीला गेला आहे.
    बारामती तालुक्यात शिरसुफळ येथील शिरसाई मंदिरात मागील चार दिवसांपूर्वीच अशीच घटना घडली होती. मात्र बारामती पोलिसांनी चोवीस तासाच्या आत या घटनेचा छडा लावून चोरट्यांना गजाआड केले होते. 

        बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील पुण्यमाता आईसाहेब मंदिर हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. लाटे गावाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरात रात्री चोरीची घटना घडल्याने ग्रामस्थांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. रात्री गावातील डीपीची वायर जळाल्याने अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केल्याचे बोलले जात आहे.
      
         या घटनेबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात अशोक खलाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पन्हाळे करीत आहेत.

मंदिराचे तोडलेले कुलूप 
देवीच्या गळ्यातील खोटे दागिने शेजारील भैरवनाथ मंदिरापाशी टाकून देण्यात आले होते

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article