
सोमेश्वरला सैनिक संघटनेने पोलीसांचे काम हलके केले - ए पी आय सोमनाथ लांडे
Wednesday, January 26, 2022
Edit
सोमेश्वरनगर ( प्रतिनिधी )
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ ,सोमेश्वरनगर येथील सैनिक संघाद्वारे पोलीसांचे काम हलके झाले आहे सैनिक संघटना द्वारे अनेक वाद परस्पर मिटवले जातात . निवडणुक असली की पोलीस संख्या कमी पडते त्यावेळी हे सैनिक स्वत: विशेष पोलीस अधिकारी बनुन पोलीसाना मदत करतात अशा सैनिक संघट्ना राज्यात सर्वत्र असाव्यात असे मत वडगाव निंबाळकर चे स पो नि सोमनाथ लांडे यानी करंजेपुल येथे व्यक्त केले. येथील कार्यालयात प्रजासत्ताक वीर नारी ललीता शिंदे, सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप व स पो नि सोमनाथ लांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन साजरा करणेत आला त्यावेळी ते बोलत होते.
" सैनिक संघटनेचे कार्य राज्यात आदर्शवत ठरावे असे आहे,त्या सर्व कार्याचे आपण साक्षीदार असल्याचे" मत सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यानी व्यक्त केले . प्रजासत्ताक दिनानिमित्त वीर नारी ललीता शिंदे यांचा सन्मान व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम यावेळी पार पडला.
सोमेश्वर कारखाना संचालक व माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, वडगाव निंबाळकर चे स पो नि सोमनाथ लांडे, करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड, ईंडीया बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन चे महाराष्ट्र ऱाज्य को ऑर्डीनेटर किरण आळंदीकर, सोमेश्वर कारखाना संचालक प्रवीण कांबळे, अभिजीत काकडे, ऋषी गायकवाड, संग्राम सोरटे, वीर नारी लिलाबाई शिंदे ई. मान्यवर यावेळी हजर होते.
पत्रकारिता करीत सामाजीक बांधीलकीने कोव्हीड काळात व त्यानंतर विविध संघटनाद्वारे सामाजीक कार्य करणारे सकाळ चे पत्रकार संतोष शेंडकर, लोकमत व सोमेश्वर रिपोर्टर चे महेश जगताप, पुढारी चे युवराज खोमणे, महाराष्ट्र न्युज चे महमद शेख, दैनिक प्रभात व राष्ट्रतेज, पब्लीक न्युज चे तुषार धुमाळ, दत्ता माळशिकारे या मान्यवरांना सैनिक संघटना व सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी द्वारे मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकामधे गणेश आळंदीकर यानी सैनिक संघटनेद्वारे सुमारे शेकडो वाद पोलीस स्टेशन अथवा कोर्टात न जाता मिटवुन कोव्हीड काळात तसेच अरिवृष्ठीत व दोन वर्षापूर्वी पुरग्रस्त सैनिक टाकळी ई ठिकाणी केलेल्या कार्याबाबत माहीती दिली.
स पो निरीक्षक सोमनाथ लांडे यानी सैनिक संघटनेद्वारे अनेक वाद परस्पर मिटत असल्याने आम्हाला मोठी मदत होत असुन अशी सैनिक संघटना सर्वत्र असावी असे मत व्यक्त केले.
ऱाजवर्धन शिंदे, किरण आळंदीकर यानीही सैनिक संघटना व सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी द्वारे मॅरेथॉन ने केलेली सुरुवातीने मोठे स्वरुप प्राप्त झाले असल्याचे सांगीतले. पोलीस नाईक विजय शेंडकर,सुहास गायकवाड, ध्वजगीत गाणारी चिमुकली सई सुधीर भापकर, प्रजासत्ताक वर भाषण करणारा कार्तिक गायकवाड, स्पोर्ट्स ॲकॅडमी अध्यक्ष भाऊसाहेब लकडे, जयराम लकडे ईं चा सत्कार यावेळी करणेत आला
स्वागत सैनिक संघटनेचे पदाधिकारी जगन्नाथ लकडे,बाळासाहेब शेंडकर, भगवान माळशिकारे, नितीन शेंडकर, राजाभाऊ थोपटे, राजाराम शेंडकर, बाळासाहेब गायकवाड, गणेश शेंडकर, मोहन शेंडकर, कारगील युद्धातील जवान, दत्तात्रय रासकर, मदने, दत्तात्रय चोरगे, ओंकार कुंभार, मोहन गायकवाड,कारंडे, अंतु चौधरी , किरण सोरटे ,अशोक रासकर , मारुती पांडोळे,विजय शेंडकर, युवराज चव्हाण, महेंद्र चव्हाण ई सैनिकानी केले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. गणेश आळंदीकर यानी केले तर आभार बारामती तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यानी मानले.