
शेतकऱ्यांच्या सेवेसाठी 'के. बी. बायो ऑरगॅनिक्स' नाशिकमध्ये दाखल!
Friday, January 14, 2022
Edit
के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर माननीय श्री. सचिन यादव सर यांच्या शुभहस्ते के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या अधिकृत स्टोअरचे उद्घाटन होऊन कंपनीचे अधिकृत स्टोअर नाशिक परिसरातील शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू झाले आहे. यावेळी बोलताना निर्यातदार शेतकऱ्यांसाठी हे स्टोअर पीक व्यवस्थापनासोबतच कृषी मार्गदर्शनासाठी कंपनीचे स्टोअर हक्काचे ठिकाण बनून जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिक येथील कंपनीच्या स्टोअरमध्ये शेतकऱ्यांच्या सेवेसाठी १५ कृषीतज्ञ सतत कार्यरत असणार आहेत जिथे मोफत कृषी सल्ल्यासोबतच कंपनीची सर्व उत्पादने उपलब्ध असतील. द्राक्ष, टोमॅटो, मिरची, पपई, डाळिंब, कांदा इत्यादी पिकांच्या रोग व किडींवर प्रभावी नियंत्रणासाठी के. बी. बायो ऑरगॅनिक्सची उत्पादने अतिशय फायदेशीर ठरतात. कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे ही उत्पादने अवघ्या ४८ तासात रोग व किडींवर रसायनांच्या तोडीस तोड परिणाम दाखवून देतात तसेच वनस्पतीजन्य कीटकनाशके म्हणजेच रसायनमुक्त असल्याने द्राक्ष तसेच इतर पिकांच्या निर्यातदार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात. कंपनीची सर्व कीटकनाशके इकोसर्ट मान्यताप्राप्त व सी.आय.बी नोंदणीकृत असून या उत्पादनांचा वापर केल्याने कीड व रोग नियंत्रणासोबतच वाढीसाठी देखील प्रभावी मदत होते. विविध पिकांवरील बुरशीजन्य रोग जसे की करपा, कूजवा, ठिपके इत्यादींच्या नियंत्रणासाठी संशोधित केलेले ‘फंगो रेझ’ व द्राक्षावरील डाऊनी नियंत्रणासाठी ‘डाऊनी रेझ’ तसेच जमिनीखालील बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी ‘रूट फिट’. रसशोषक किडींवर प्रभावी मात करण्यासाठी ‘पेस्टो रेझ’, थ्रिप्स नियंत्रणासाठी ‘थ्रिप्स रेझ’, व्हायरस नियंत्रणासाठी प्रभावशाली ठरणारे ‘व्हायरो रेझ’, विविध प्रकारच्या अळी नियंत्रणासाठी ‘लार्वो रेझ’, डाळिंबावर येणारा तेल्या तसेच इतर जीवाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ‘बॅक्टो रेझ’, लाल व पिवळ्या कोळीच्या नियंत्रणासाठी 'आर- माईट', पिठ्या ढेकणावर संपूर्ण नियंत्रणासाठी 'मिली रेझ', क्षारांच्या समस्येवर प्रभावी मात करून पिकांच्या वाढीस उपकारक ठरणारे 'पी.एच. ट्यूनर'., सर्वोत्तम स्टिकर, पेनिट्रेटर आणि रेन फास्टनर अश्या बहुउपयोगी गुणधर्म असणारे 'बॅलनस्टिक' आणि के. बी. बायो ऑरगॅनिक्सचे दर्जेदार नीम 'ऑरगा नीम' ही उत्पादने महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील बहुपयोगी ठरत असून शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरत आहेत जी तुम्हाला तुमच्या परिसरात या स्टोअरच्या माध्यमातून अगदी सहजपणे उपलब्ध होणार आहेत. या उद्घाटनावेळी कंपनीतील पदाधिकारी अशांत साबळे, हेमंत खलाटे, शुभांगी नारकर, हरिदास चव्हाण, ओंकार पाटील, चेतन मोगल, राकेश जाधव, अविनाश कोरडे, विशाल बोडके, मयूर देशमुख तसेच प्रगतशील शेतकरी देखील उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क - 1800 5725 788
के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि.
व्यापारी संकुल-मार्केट यार्ड, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक