-->
पिसुर्टीतील गायकवाड कुटुंबीयांचा अनोखा अस्थि विसर्जनाचा  कार्यक्रम... अस्थि नदीत विसर्जित न करता अस्थि शेतात केल्या विसर्जित

पिसुर्टीतील गायकवाड कुटुंबीयांचा अनोखा अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम... अस्थि नदीत विसर्जित न करता अस्थि शेतात केल्या विसर्जित

निरा- पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी गावातील गायकवाड कुटुंबीयांनी त्यांच्या आईच्या अस्थि आणि राख आपल्या शेतात विसर्जित करून एक आदर्श घालून दिलाय. अस्थि आणि राख निदिच्या पाण्यामध्ये विसर्जित करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. मात्र अशा प्रकारे अस्थि आणी राख पाण्यात  विसर्जित केल्याने पाण्याचा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होतीय आणि त्यामुळेच  गायकवाड कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे. एक प्रकारचा चांगला आदर्श त्यानी घालून दिला आहे.
                 पिसुर्टी गावचे रहिवाशी व भारतीय बौद्ध महासभेचे पुरंदर तालुका अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांची चुलती व तुकाराम गायकवाड व प्रदीप गायकवाड यांच्या ९० वर्षीय मातोश्री तानुबाई सयाजी गायकवाड यांच  दिनांक ४ जानेवारी रोजी पहाटे निधन झाले. सकाळी पिसुर्टी येथे त्यांच्या शेतामध्ये त्यांच्यावर  अंत्यविधी करण्यात आला होता . अंत्यविधी संपन्न झाल्यानंतर संपूर्ण गायकवाड परिवारातील सदस्य त्यांची मुले व मुली गंधारी काकडे, लता मानकर, वंदना जगताप, चादाताई कदम, यांनी अस्थी पाण्यात न सोडता अस्थी व राख शेतातच विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. आज  नातेवाईक व  गावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत दशक्रिया विधी संपन्न झाला. यावेळी  त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शेतात झाडे लावली. व अस्ति आणि  राख शेतातच विसर्जित करण्यात आली. या कुटबानी समाजामध्ये अंधश्रध्दा व निसर्ग प्रदूषण यांचा विचार करुन समाजाने पुरोगामी विचार परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे  दाखवून दिले आहे  असे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे .

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article