-->
लाटे येथे शेतीदिनानिमित्त क्रांँपसँप अंतर्गत मका पिक शेतीशाळा कार्यक्रम संपन्न

लाटे येथे शेतीदिनानिमित्त क्रांँपसँप अंतर्गत मका पिक शेतीशाळा कार्यक्रम संपन्न

मौजे लाटे येथे दि. 22/01/2022 रोजी क्रांँपसँप अंतर्गत मका पिक शेतीशाळा व शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
          बारामती तालुक्यातील मौजे लाटे येथे रब्बी हंगाम सन-2021-22 मध्ये 22 आँक्टोबर 2021 पासून मका या पिकांची शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात आली. लाटे व बजरंगवाडी येथील मका  उत्पादक 25 शेतकऱ्यांची निवड करून दर 15 दिवसांनी 1 वर्ग असे एकूण 10 शेतीशाळा वर्गाचे नियोजन करण्यात आले आहे . या शेतीशाळेमध्ये मका पिकाच्या पूर्व मशागती पासून , उगवण क्षमता तपासणी, वाण निवड, बिज प्रकिया, बी बी एफ पेरणी, किड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, काढणी,मळणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान, साठवणूक, विक्री व्यवस्था, व प्रकिया उद्योग या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
 
             संपन्न झालेल्या शेतीशाळेच्या शेतीदिना निमित्त शेतीशाळेच्या झालेल्या वर्गाचा आढावा व शेतकऱ्यांचे मनोगत घेण्यात आले. यावेळी श्री पी जी शिंदे -कृषि पर्यवेक्षक,  उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, बारामती यांनी मका उत्पादनाची सूञे, सेंद्रिय शेती आणि कृषि विभागाच्या योजना याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी गणेश लबडे- केबी शास्ञज्ञ यांनी स्वीट मका याचे लागवडी पासून ते मार्केटींग पर्यंत सर्व माहिती  व मार्गदर्शन केले तसेच रब्बी हंगामातील गहु, हरभरा व कांदा या पिकाविषयी मार्गदर्शन केले. 
         याशेतीशाळेचे नियोजन उपविभागीय कृषि अधिकारी - मा. श्री वैभव तांबे साहेब व तालुका कृषि अधिकारी - मा. सौ Supriya बांदल मँडम, यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. 
        शेतीशाळा यशस्वी होण्यासाठी कृषि सहाय्यक - राहुल भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. आजच्या शेतीशाळेला शेतकरी गटाचे सर्व सदस्य,सो स सा कारखान्याचे मा. संचालक- मा. श्री सचिन खलाटे, वि का स सोसायटीचे चेअरमन- मा. श्री महादेव साबळे, जितु जाधव, संतोष खलाटे, अशोक खलाटे, गणपत खलाटे, सुधाकर खलाटे, लक्ष्मण जाधव, विशाल बोबडे व इतर शेतकरी उपस्थित होते. 
       सूत्रसंचलन राहुल भोसले यांनी केले तर आभार संतोष खलाटे यांनी मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article