-->
शेतीनिष्ठ व्यक्तिमत्त्व....

शेतीनिष्ठ व्यक्तिमत्त्व....

 आदरणीय श्री.प्रदिपराव भगवानराव काकडे, देशमुख यांचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा...
 सोमेश्वर पंचक्रोशी त्यांना बालवयापासून बाळुभैया या लडवाळ आणि प्रेमळ नावाने ओळखतो.हे टोपण नांव त्यांनी तितक्याच माणूसकीने सार्थ करुन दाखवले आहे.त्यांची सुविद्य पत्नी या गुळुंच्याच्या कै.विजयसिंह सुरसिंगराव निगडे देशमुख यांच्या कन्या.. त्यामुळे तसा हक्काचा ऋणानुबंध..तसं हे व्यक्तिमत्त्व हेवेदावे, राजकारण याच्या पलिकडचे..मात्र सामाजिक हित जपणारे.सामान्य वर्गातील तरुणाचे नोकरी मिळून जीवनाचे भले होत असेल तर तोलामोलाचा वजनदार शब्द वापरुन त्याचा सोन्याचा संसार करणारं व्यक्तिमत्त्व..हा माझा स्वानुभव.शिवाय निरपेक्ष वृत्तीने..घराण्याची परंपरा जपणारं.. गेल्यावर्षी करोना काळात सामान्य माणसांची झालेली परवड.त्यांची विझलेली चूल पेटली पाहिजे या हेतूने केलेली मदत, तत्पूर्वी कोल्हापूर,सांगली भागात पुराने उध्वस्त झालेली कुटुंबे.त्यांच्यासाठी सढळ हाताने पाठविलेली मदत..पण कुठेही प्रसिद्धीचा हव्यास नाही.ना फोटो.हा आईवडिलांच्या संस्कार आणि संस्कृतीचा अंगभूत गुण.राजकारण ही गरजेपुरते..शेतीशी संबंधीत ऊस वाहतूक संस्थेचे अध्यक्ष पद असले तरी त्याच्याशी प्रमाणिकपणे कार्यरत राहणे एवढंच या व्यक्तिमत्वाची ओळख..इतरत्र कारणाशिवाय सहभाग नाही.देवत्वावर श्रद्धा हा या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव..त्या शक्तीपुढे नतमस्तक होऊन सर्वांसाठी करुणा  भाकणे हा आवडीचा भाग.दुसऱ्यासाठी हित चिंतनारी अशी माणसं समाजात विरळ असतात.. म्हणून परोपकार करणं हा गुण त्यांच्यात दिसतो.शेतीत रमून जायचे.. मुलांप्रमाणे शेतीतील पिके जपायची..शेती किफायतशीर झाली पाहिजे यासाठी शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढीचे तंत्र अवलंबले जाणारे हे व्यक्तिमत्त्व.. तात्पर्य शेतीशी एकनिष्ठ राहून त्यात रमून जाणे ही त्यांची खासियत..काळ्या आईची सेवा ही परमेश्वरांची सेवा हा विचार मनाशी बाळगून नाहक नको त्या बाबी पासून दूर राहण्यात धन्यता मानणारा माणूस  म्हणजे बाळुभैया ही समाजमान्यतेची बिरुदावली त्यांनी प्राप्त केलेली दिसून येते.सतत  हसतमुख राहून अहंकाराचा स्पर्श व्यक्तिमत्वाला त्यांनी होऊ दिला नाही हे त्यांचे स्वभाव वैशिष्टे...मग सामाजिकतेचे वर्तुळ पूर्ण व्हायला काय लागते..? निरामाई जशी संथ वाहते...पण परोपकार करत तसं आदरणीय भैयांची आदर्शवत सामाजिक वाटचाल चाललेली जाणवते..शांत आणि संयमी स्वभाव यामुळे सामान्य माणूस आपली कैफियत घरातल्यामाणसांप्रमाणे सहज व्यक्त करतो.कारण आपल्या प्रश्नांची सोडवणूक होणार याची त्याला पुरेपूर खात्री असते.असं हे श्रद्धाळू, परोपकारी,शांत,संयमी,शेतीशी एकनिष्ठ असणारे व्यक्तिरुपी झाड बहरत राहो.आपल्याला वात्सल्याच्या सावलीत प्रेमाच्या हक्काने विसावता येवो यासाठी त्यांना आरोग्यपूर्ण उदंड दिर्घायुष्य लाभो अशी सोमेश्वरांकडे प्रार्थना करुया... आदरणीय बाळुभैया व त्यांच्या कुटुंबीयांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा....                      
श्री.संभाजी सिताराम गायकवाड सर, करंजेपूल मो.नं.७७६८०९८२९६

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article