
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतले मयुरेश्वराचे दर्शन; प्रलंबित विकास आराखडा निधीबाबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन
Tuesday, January 25, 2022
Edit
मोरगाव : अष्टविनायक तिर्थस्थळ मोरगांव ता. बारामती येथे आज मयुरेश्वराचे दर्शन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतले. यावेळी अभीषेक पुजा करुन देश कोरोनामुक्त होण्यासाठी मयुरेश्वराकडे याचना केली.
आज दुपारी तीन वाजता माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मोरगाव येथे मयुरेश्वर दर्शनासाठी आले होते. यावेळी मंत्रोपचाराच्या सहाय्याने अभीषेक पुजा येथील पुजारी किशोर वाघ, विजय ढेरे व ग्रामजोशी दिलीप वाघ, कौस्तुभ वाघ यांनी केली. अभीषेक, संकल्प व आरती नंतर त्यांनी कोरोनामुक्त महाराष्ट्र व देश होण्यासाठी मयुरेश्वरास त्यांनी याचना केली.
मंदिर परीसरात असणाऱ्या स्वच्छते विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार व मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी जावडेकर यांचा सत्कार केला. यावेळी पर्यटन विकास मंडळाकडुन प्रलंबित असलेला विकास आराखडा व त्यांसंबंधी लागणाऱ्या निधीबाबतचा पाठपुरावा करुन लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपस्थितांना त्यांनी दिले.