राज्यातील दुकानांवर आता मराठी भाषेत नामफलक लावण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. क लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यांची नावसुद्धा बदलली जात आहेत. राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्यांची नावं देण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले गड-किल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.
आता त्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या नावाने ते ओळखले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी मुंबई शहराच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवले आहे. या बंगल्यांची नावं बदलून त्यांना गडकिल्ल्यांची नावं देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे.त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले हे गडकिल्ल्यांच्या नावां ओळखले जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणत्या किल्ल्याचं नाव देण्यातं आलं आहे, ते पाहूया
कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणतं नाव?
अ 3 – शिवगड – जितेंद्र आव्हाड
अ 4 – राजगड – दादा भुसे
अ 5 – प्रतापगड -के.सी. पाडवी
अ 6 – रायगड – आदित्य ठाकरे
अ 9 – लोहगड –
बी 1 – सिंहगड – विजय वड्डेटीवार
बी 2 – रत्नसिंधू – उदय सामंत
बी 3 – जंजिरा – अमित देशमुख
बी 4 – पावनगड – वर्षा गायकवाड
बी 5 – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ
बी 6 – सिद्धगड – यशोमती ठाकूर
बी 7 – पन्हाळगड – सुनील केदार
क 1 – सुवर्णगड – गुलाबराव पाटील
क 2 – ब्रह्मगिरी – संदीपान भुमरे
क 3 – पुरंदर
क 4 – शिवालय
क 5 – अजिंक्यतारा – अनिल परब
क 6 – प्रचितगड – बाळासाहेब पाटील
क 7 – जयगड
क 8 – विशालगड