वडगाव निंबाळकर मध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
Sunday, January 23, 2022
Edit
प्रतिनिधी: सुनील जाधव
वडगांव निंबाळकर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे आज हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. देशावर करोनाचे सावट असताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव निंबाळकर येथे आज विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलेश मदने,शाखाप्रमुख नितीन गायकवाड व गणेश पाटोळे,भगवान जायपत्रे, धनंजय पंडित,सनी प्रसाद धनंजय धायगुडे, सुभाष राऊत भैय्या खोमणे, जितेंद्र आधी शिवसैनिक एकत्र येऊन जयंती साजरी करण्यात आली. येत्या काळात नियोजित केलेले आरोग्य शिबिर यावर मार्गदर्शन केले.लवकरात लवकर आरोग्य शिबिर आयोजन होणार आहे.असे त्यांनी सांगितले व बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.