
अजितदादांनी दिलेल्या संधीचे सोनं करणार - साधू बल्लाळ
Thursday, January 13, 2022
Edit
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार समाज कल्याण सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या निर्णयानुसार जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची रचना जाहीर करण्यात आली यामध्ये बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साधू रावसाहेब बल्लाळ यांची या समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.
निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली समितीचे अध्यक्ष पुणे जिल्हाधिकारी असून या समितीत आमदार व खासदार सदस्य आहे. रावसाहेब बल्लाळ यांनी आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी मुळे या कामाची पावती म्हणून त्यांची या समितीवर निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल मोहन वाल्हेकर सरचिटणीस भारतीय युवा पँथर संघटना महा.राज्य बारामती तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली थोपटेवाडी येथे साधू बल्लाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथम माजी सैनिक कै.दिलीप भिकोबा शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सत्कारमुर्ति बल्लाळ यांनी त्याच्या भाषणात कामाची पद्धत, दलित, पिडितांना कशा प्रकारे न्याय मिळवून देणार याबद्दल माहिती दिली.
बल्लाळ यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, बारामती तालुका किंवा पुणे जिल्ह्यामध्ये ही दक्षता समिती सर्व जाती धर्माला घेऊन चांगलं काम करेल या समितीच्या माध्यमातून हे काम चांगलं करता येईल ते निश्चित पणाने केले जाईल. या समितीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त दलित पीडितांना मदत कशा पद्धतीने मदत करता येईल व समन्वय कसा साधता येईल हे समजावून सांगितले. आदरणीय अजितदादा पवार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला निधी दिल्याने दादांचे आभार समाजाच्या वतीने मांडण्यात आले. यावेळी साधू बल्लाळ यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असताना कधी पक्षात जातीपातीचे राजकारण कधी पक्षाने केले नाही आणि ही कधी पक्षही करत नाही म्हणून इथून पुढच्या काळामध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहून सामाजिक बांधिलकी म्हणून पक्षाबरोबर प्रामाणिकपणे काम करणं हेच माझा उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले इथून पुढच्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून व या समितीच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे पक्ष संघटना असो किंवा सामाजिक संघटना असो या माध्यमातून मी चांगले काम करेल असे सत्काराच्या निमित्ताने सांगितले.
या कार्यक्रमासाठी कामगार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष लखन कडाळे, पत्रकार अमर वाघ, पत्रकार सोमनाथ जाधव, ह.भ.प.सकाटे महाराज, संजय जाधव,आदिक चव्हाण, नंदकुमार अडागळे, निवृत्ती जगधने, ग्रामपंचायत सदस्य खांडेकर, रोहन अडागळे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेवटी आभार सकाटे महाराज यांनी मानले.