
पणदरे येथील २३ वर्षीय मुलीला सोशल मिडीयावरती बदनामी व चेहरा विद्रुप करून टाकण्याची धमकी; वढाणे येथील एकावर वडगांव पोलिसांत गुन्हा दाखल
Thursday, January 13, 2022
Edit
बारामती: - सोशल मिडीयावरती बदनामी व चेहरा विद्रुप करून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील वढाणे येथील गिरीश विलास चौधरी याच्या विरोधात पणदरे येथील २३ वर्षीय मुलीने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, मागील 1 वर्षा पासुन सोशल माध्यमामावर व 19/09/2021 रोजी पणदरे ता.बारामती जि.पुणे येथे फिर्यादीचे यांचे राहते घरात
आरोपी याने मागील 1 वर्षापासुन फिर्यादीचे फेसबुक मेसेंजर अँपवर अश्लील भाषेत मेसेज करुन, फिर्यादीस नको असलेली जवळीक साधण्याचे मेसेज करुन आरोपीचे फिर्यादीवर प्रेम आहे. अशा स्वरुपाचे मेसेज वारंवार केलेले आहेत.त्यानंतर आरोपी वेगवेगळे फेसबुकवर अकाऊंट तयार करुन फिर्यादीचे फेसबुक मेसेंजर अँपवर वेगवेगळ्या स्वरुपाचे व मजकुराचे फिर्यादीशी जवळीक साधण्याचे मेसेज पाठविले त्यानंतर फिर्यादीचे मेल आय डी वरती आरोपी हा वेगवेगळ्या मेल अँड्रेसवरुन अश्लील भाषेत मेसेज करुन, फिर्यादीस नको असलेली जवळीक साधण्याचे मेसेज करुन त्याचे फिर्यादीवर प्रेम आहे, व आरोपी हा फिर्यादीचे मेसेजला रिप्लाय न दिल्यास तुझी सोशल मिडीयावरती बदनामी करेन व तुझा चेहरा विद्रुप करुन टाकेल अशा स्वरुपाचे धमकीचे मेसेज वारंवार केलेले आहेत.तसेच काल दि.12/01/2022 व आज दि.13/01/2022 रोजी आरोपीने फिर्यादिचे वरील मेल आय डी वरती फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरुपाचे मेसेज केले आहेत.तरी मागील 1 वर्षापासुन पासुन आरोपी मजकुर याने सोशल माध्यमांच्या साह्याने अश्लील स्वरुपाचे मेसेज करुन फिर्यादीने आरोपीशी जवळीक साधावी या हेतुने प्रयत्न करुन फिर्यादीचा पाठलाग करुन चेहरा विद्रुप करण्याचे धमकी दिली आहे.दि.19/09/2021 रोजी गावी पणदरे येथे फिर्यादीचे घरात येवुन फिर्यादीच्या आई वडीलांना म्हणाला की तिला मला भेटायला सांगा नाहीतर मी तिची बदनामी करेन आणी तिचा चेहरा विद्रुप करुन टाकीन अशी धमकी देवुन फिर्यादीचे आईवडिलांनाही शिवीगाळ करुन त्यांचे अंगावर लाकडी दांडके घेवुन त्यांना मारहान करण्यासाठी धावुन गेला म्हणुन गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा प्रथम वर्दी रिपोर्ट कोर्टास रवाना करुन गुन्ह्याचा पुढील तपास पो ना खोमणे करीत आहेत.