
Stand with Kiran Mane; किरण माने यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ट्रेंड सुरू काट लो जुबान आसुओं से गाऊंगा…’ किरण माने यांचे सोशल मीडियावर वादळ
Friday, January 14, 2022
Edit
मराठी अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील “मुलगी झाली हो”या मालिकेतून काढून टाकल्यानंतर सोशल मीडियावर वादळ उठले असून अभिनेता किरण माने यांच्या समर्थनार्थ ट्रेंड सुरू झालेला पहावयास मिळत आहे.
सध्या स्टार प्रवाह या चॅनल वर “मुलगी झाली हो” ही मालिका प्रसिद्धीच्या झोतात आहे. यात अभिनेते किरण माने हे विलास पाटील यांची भूमिका पार पाडत आहेत.
घरोघरी लोकप्रिय असलेल्या या मालिकेतील अभिनयामुळे प्रसिद्ध असलेले अभिनेते किरण माने हे मूळचे सातारचे असून ते सोशल मीडियावर सातत्याने आपली भूमिका मांडत असतात. त्यांना आलेले अनुभव, तसेच त्यांची मते ते सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत असतात.
अभिनेते किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याचे कारण सांगत स्टार प्रवाह वरून त्यांना या मालिकेतून कमी केल्याची वार्ता सोशल मीडियावर समजताच नेटकरी मोठा संताप व्यक्त करत आहेत.
या घटनेनंतरही अभिनेते किरण माने यांनी “काट लो जूबान , आसुओ से गाउंगा… गाड दो बीज हू मै. पेड बन ही जाऊंगा” असे म्हणत पोस्ट लिहिली असून त्यांनी ही भावना व्यक्त केल्या आहेत.
किरण माने यांच्या समर्थनार्थ अनेकांनी पोस्ट लिहून मोठा मोठा संताप व्यक्त केला आहे तर स्टार प्रवाह विरोधात मिस्म देखील पाहायला मिळत आहे.
Stand with Kiran Mane असे म्हणत नेटकरी ट्रेण्ड चालवत असून सोशल मीडियावर या ट्रेंड ला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.