
शिवजयंतीसाठी राज्य शासनाकडून नियमावली जाहीर; शिवज्योत आणण्यासाठी 200 तर उत्सवाला 500 जणांना परवानगी
सर्व आरोग्य नियमांचे पालन करून आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मसोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शिवज्याेत आणि जन्मोत्सव सोहळ्यामधील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
राज्यात दोन दोन शिवजयंती नको, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला म्हणजेच जन्मतारखेनुसार साजरी करावी, अशी मागणी शिवसेना आमदार मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. शिवजयंतीच्या दोन तारखा आणि वाद सोडविण्यासाठी 1966 मध्ये महाराष्ट्र सरकारने इतिहास कारांची एक समिती नेमली होती. मात्र, या नेमलेल्या समितीमध्ये शिवरायांची जयंती एकाच तारखेला साजरी करावी, अशी एकवाक्यता झाली नाही.