-->
बारामती: अमराई मध्ये परस्पर विरोधी विनयभंगाच्या तक्रारी दाखल

बारामती: अमराई मध्ये परस्पर विरोधी विनयभंगाच्या तक्रारी दाखल

अल्पवयीन पीडित महिलेने तक्रार दिली की ती रस्त्याने जात असताना महेश धोत्रे गणेश तुळशीराम पवार राहणार पिडीसीसी बँक जवळ अमराई यांनी तिचा हात पकडला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले अशी फिर्याद दिल्याने वरील दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पोस्को व विनयभंग या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
          तसेच एक महिला हिने तक्रार दिली की भरत पवार युवराज पवार राजू धोत्रे राहणार पोस्ट ऑफिस जवळ या तिघांनी तिला मारहाण करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन जुन्या भांडणाच्या कारणावरून केले अशी फिर्याद दिल्याने भादवि कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरील तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे वरील दोन्ही फिर्यादी तील आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यामध्ये जुना वाद आहे. पोलिसांनी दोन्ही महिलांनी तक्रार दिल्याने तात्काळ दाखल करून दोन्ही बाजूचे लोकांना अटक केली आहे. सदर बाबत बारामती शहर गुन्हा नंबर 38 व 39 असे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे व पोलीस हवालदार काळे हे दोन्ही गुन्ह्याचे तपास करत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article