
बारामती तालुक्यात चोरट्यांचा पुन्हा एकदा धुमाकूळ; खंडोबाचीवाडी, वाणेवाडी व वाघळवाडी येथील घरे फोडली
Friday, February 11, 2022
Edit
बारामती तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून दिवसा महिनाभरात 5 घरफोड्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात कऱ्हावागज येथे 2 घरे फोडली त्यात 30 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले । आज दुपारी 1 च्या सुमारास वाणेवाडी येथील 2 घरे, वाघळवाडी व खंडोबाचीवाडी (घुमटवस्ती) येथील एका घरातील 6 तोळे सोने चोरी झाल्याची माहिती मिळत आहे. या तीन गावांमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून वाणेवाडी येथून पाऊण तोळा सोने व वाघळवाडी येथून रोख रक्कम ४५००रुपये असे चोरीला गेल्याचे समजत आहे.