
कोऱ्हाळे खुर्द सोसायटीची निवडणूक बिनविरोध
Sunday, February 13, 2022
Edit
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. १३ जागांसाठी १३ उमेदवारांकडून अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. विरोधकांना येथे उमेदवारी अर्जही दाखल करता आले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वरच्या संचालिका प्रणिता खोमणे, विद्यमान सरपंच गोरख खोमणे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाच्या सर्व १३ जागा बिनविरोध झाल्या.
कोऱ्हाळे खुर्द सोसायटीचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे व सर्वांना बरोबर घेऊन केल्यामुळे तसेच कोरोना काळ असतानासुद्धा सोसायटीने दिलेला लाभांश यामुळे सभासदांनी आमच्यावर सार्थ विश्वास टाकला असून यापुढेही नामदार अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी मार्फत सभासदांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जाणार असल्याचे तसेच पूरक व्यवसाय सुरू करणार असल्याचे सोसायटीचे मार्गदर्शक डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले.
तसेच कोराळे खुर्द येथील दुसरी संस्था शरद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये सुद्धा एकूण 13 जागांपैकी 12 जागा बिनविरोध निवडून आल्या असून एका जागेसाठी लढत होण्याची शक्यता आहे. 12 जागा बिनविरोध झाल्याने सत्ताधारी गटाची सत्ता कायम राहणार आहे.
कोऱ्हाळे खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत बिनविरोध झालेले उमेदवार
गोरख बाबूराव खोमणे
ज्ञानदेव जयसिंग आटोळे
सुरेश नामदेव खोमणे
प्रताप चांगदेव खोमणे
बाळासो आण्णासो खोमणे
लक्ष्मण विठ्ठल जायपत्रे
छगन ज्ञानदेव शेवाळे
प्रवीण सुरेश भोसले
कल्याण बापूराव खोमणे
कान्होपात्रा बापूराव खोमणे
हेमलता सुरेश खोमणे
ज्ञानदेव कृष्णा पवार
शहाबुद्दीन जानमहंमद शेख