
बारामती शिक्षक सोसायटीच्या संचालक पदी अशोक भापकर व सचिन बारवकर
Tuesday, February 15, 2022
Edit
सोमेश्वर नगर - प्रतिनिधी बारामती तालुका शिक्षक क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी अशोक भापकर व सचिन बारवकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन गणेश भगत यांनी दिली
बारामती तालुका शिक्षक सोसायटी ही तालुक्यातील अग्रगण्य आर्थिक संस्था आहे, माजी चेअरमन दिलीप बारवकर यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली, यावेळी मेडद येथील कार्यरत शिक्षक सचिन बारवकर यांची निवड करण्यात आली, पुणे जिल्हा परिषद येथे विस्तारअधिकारी पदी कार्यरत असलेले अशोक तुकाराम भापकर यांची तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली, लोणीभापकर गावातील भापकर व बारवकर यांना एकाच वेळी संचालक पदाची संधी मिळाली, यामुळे लोणी भापकर परिसरातील शिक्षकांनी या निवडीचे स्वागत केल्याची माहिती उपसभापती शिवदत्त भोईटे यांनी दिली
संस्थेच्या लोकल ऑडीटरपदी देऊळगाव केंद्रातील उंडवडी येथील जेष्ठ शिक्षक बाळासाहेब ननवरे व आदर्श तंत्रस्नेही शिक्षक गणेश महामुनी यांची निवड करण्यात आली, सर्व निवडी एकमताने करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव संतोष राऊत यांनी दिली
संस्थेची वैशिष्ट्ये
संस्थेचा व्याजदर अत्यंत कमी असून तो ८.४० % इतका आहे तर सभासदांना १२.१० % लाभांश दिला गेला आहे. सभासदांना सुमारे ३० लाख कर्ज दिले जात असून २० लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे.
अंशदायी पेन्शन विमा ३० लाख पर्यंत आहे