
बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन मोटार सायकल चोर जेरबंद; ३ मोटरसायकल केल्या हस्तगत
Saturday, February 5, 2022
Edit
बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत मौजे जळोची ता . बारामती जि.पुणे येथिल एच.पी. पेटोलपंप समोरून श्री सहदेव विठोबा डोंबाळे रा . दुर्गा टाकीसमोर बारामती जि.पुणे यांची सुझुकी लेटस मोटर सायकल नं एम.एच ४२ ए ई १४८० कोणी अज्ञात चोरटयाने चोरी केली बाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ४१ / २०२२ भा.द.वी.क ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल झाले नंतर सदर गुन्हाचे अनुशंगाने बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत पेटोलिंग करीत असताना एक इसमास संशयीत वाटलयाने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अंबादास बबन कवाळे वय ३० वर्षे रा . काठेवाडी ता . बारामती जि.पुणे याचेकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हा घडले ठिकाणवरून एक मोटारासायकल चोरी केल्याची कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात दि .०३ / ०२ / २०२२ रोजी २१:३४ वा अटक करून मा.न्यायालाय बारामती याचें समक्ष दि .०४ / २ / २०२२ रोजी रिमांड कामी हजर केले असता मा . न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी मंजुर केली आहे . तपासादरम्यान अटक आरोपी कडुन वर नमुद मो.सा क एम.एच ४२ ए.ई १४८० किंमत रूपये १५,००० / -हि हस्तगत करून सदर गुन्हया उघडकीस आनला तसेच सदर आरोपीकडे अधिक विचारपुस चौकशी केली असता त्याने बारामती तालुका पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी बारामती हददीतुन एक मोटारा सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ५७३ / २०२१ भा.द.वी क ३७ ९ प्रमाणे दाखल गुन्हयातील मोटारसायकल क एम.एच ११ बी एक्स ६४३५ होण्डा शाईन किंमत रूपये ३०००० / - हि आरोपीकडुन हस्तगत करून गुन्हा उघडकीस आनला आहे . तसेच लोणीकद पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली बजाज पल्सर मो . सा नं एम . एच १२ आर आर ६६६४ किंमत ८५,००० / - रूपये हि देखिल हस्तगत करून एकुण १,३०,००० / - रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस अधिक्षक सो श्री अभिनव देशमुख पुणे ग्रामीण , मा.अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग श्री . मिलीद मोहिते , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक श्री सुनिल महाडीक यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सागर ढाकणे , सहा . फौजदार संजय जगदाळे , पोहवा कांबळे , पो.ना. कोळेकर, खांडेकर पो.कॉ. चव्हाण , कोठे, इंगोले यांनी केली . सदर गुन्हयाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.