
पुणे जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या वाढणार? ७३ की ८३ संभ्रम कायम
Wednesday, February 2, 2022
Edit
गेल्या दहा वर्षातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या गट-गणांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेत हवेली तालुक्यातील पुणे महानगरपालिकेतील सामाविष्ठ भाग वगळून ७३ जिल्हा परिषद गटांची रचना झाली होती. मात्र राज्य मंत्री मंडळाने निर्णय बदलल्याने पुणे जिल्ह्यात गट संख्या वाढणार की तेवढीच राहणार असल्याचा संभ्रम असताना, राज्य निवडणूक आयोगाने तोंडी सूचना देऊन जिल्हा परिषद गटांची प्रारुप रचना व नकाशे सादरीकरण करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद गटांची संख्या किती राहणार? हे संभ्रमात आहेत.
सध्या राज्यात एका जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त ७५ आणि कमीत कमी ५० गट आहेत. त्यामध्ये वाढ करून जास्तीत जास्त ८५ आणि कमीत कमी ५५ गट तयार करण्याचा निर्णय शासनचा आहे. परंतु अधिसूचना काढण्यात आली नसल्याने जुन्या- नव्या निर्णया प्रमाणे गटांची संख्या निश्चित होणार याबद्दल अद्यापही संभ्रम आहे. जिल्हा परिषद गटांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला, परंतु या निर्णयाची अधिसूचना अद्यापही काढण्यात आलेली नाही.
राज्य सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात ८३ गट व १६६ गण गृहीत धरून गट-गण प्रारूप रचना सादर करण्याच्या तोडी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रारुप रचना व नकाशे सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व प्रांत अधिका-यांना दिल्या आहेत. अशातच जिल्हा प्रशासनाने नुकतेच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ७३ गट अस्तित्वात आले होते. आता मात्र गटांची संख्या वाढल्याने जिल्हात गटांची व गणांची पुर्नरचना होणार असल्याचे स्पष्ट असल्याने नव्याने गटांची विभागनी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.