
बारामतीत दिवसा बंद घरे फोडून लुट करणारा अट्टल चोरटा जेरबंद; बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी
Wednesday, February 16, 2022
Edit
बारामती:- बारामती शहरामध्ये बंद घरे फोडून लुट करुन चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्याप्रमाणे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती गणेश इंगळे, यांनी बारामती शहर पोलीस ठाणे सदरचे गुन्हे उघड करणेबाबत सक्त आदेश दिले होते.
त्याप्रमाणे याप्रकारचे गुन्हे करणारे आरोपीबाबतीत माहिती काढून तपास करायच्या सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार अभिजित कांबळे, संजय जाधव, संजय जगदाळे, रामचंद्र शिंदे, कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, अंकुश दळवी, रणजित देवकर, दशरथ इंगोले, अजित राऊत असे तपास पथक तयार करुन याप्रकारे गुन्हयाचे पद्धतीचा अभ्यास करुन शेजारील जिल्हयातील आरोपींची माहिती घेतली असता आरोपी नामे लोकेश रावसाहेब सुतार वय २८ वर्षे रा . लिंगनूर ता. मिरज जि. सांगली हा कळंबा कोल्हापूर येथील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असून त्याची पद्धत याप्रकारचे गुन्हे करण्याची असल्याने व तो अट्टल घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्यास बारामती शहर पोलीस स्टेशन येथे ताबा वॉरंटने आणून त्याचेकडे कौशल्यपुर्ण रितीने समांतर चौकशी तपास केला असता सदर आरोपीने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये सर्व दिवसा घरफोडी त्याचा साथीदार संदिप यशवंत पाटील रा. लिंगनूर ता. मिरज जि. सांगली याचेसह निष्पन्न झाले आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. सदर आरोपी याचेकडून खालील गुन्हयातील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याने महिलांचे बचत करुन खरेदी केलेले स्त्री धन दागिने जप्त केल्याने यातील फिर्यादी यांचे चेहऱ्यावर समाधन दिसून येत आहे.
यापुढे सर्व बारामतीकरांना विनंती आहे कि, आपले घर व फ्लॅटला मजबूत कुलुप लावा, लोखंडी ग्रिल बसवून घ्या तसेच, आपले घराजवळ अगर सोसायटीमध्ये सी सी टी. व्हि बसवून घ्या. शक्यतो दागिने लॉकरमध्ये ठेवा कारण किमती वस्तूंची सुरक्षितता पाहणे हे धारकाचे प्रथम कर्तव्य आहे. नाहीतर मनस्ताप वाट्याला येतो. पोलीस तर त्यांचेकाम कौशल्याने करुन तपास करणार आहे . तरी सदरबाबत सर्व बारामतीकरांनी खबरदारी घेणेबाबत पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी आवाहन केलेले आहे.