
अरे देवाला तरी सोडा.... वडगाव निंबाळकर मधील विष्णू मंदिरात देवाची मूर्ती लंपास
Tuesday, February 22, 2022
Edit
बारामती :वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी सुनील जाधव) वडगाव निंबाळकर तालुका बारामती येथील पुरातन काळातील विष्णू पंचायानं मंदिरात चोरी, या मंदिरातील पंचधातूची मूर्ती चोरीला गेल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला.सायंकाळी दिवाबत्ती केलं तर मंदिर बंद करण्यात आले सकाळी पूजेसाठी राजेंद्र काकडे पुजाऱ्यांनी मंदिर उघडल्यास गाभार्याचे दार उघडतात आतील बाजू मूर्ती चोरीला गेली असे दिसलें. ही मूर्ती पंचधातूची सुमारे शंभर वर्षांपूर्वी होती. पुरातन मंदिर घडलेल्या प्रकाराबाबत भाविकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. तसेच चोरी झाल्याचे कळलेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.