
राजकारणामध्ये शेवटच्या घटकातील लोकांसाठी जो जगतो त्याचेच जीवन सार्थ ठरते; सतीश मामा खोमणे यांचे कार्य ही तसेच आहे -डॉक्टर दिगंबर दुर्गाडे
Saturday, February 26, 2022
Edit
सत्तेच्या पदावर असो किंवा नसो जी व्यक्ती राजकारणात राहून समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकांचा विचार करून काम करते त्यांच्या हितासाठी सुखदुःख साठी धावून जाते तीच माणसं जनतेच्या हृदयात स्थान मिळवतात असे उद्गार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री सतीश मामा खोमणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्यावतीने आयोजित केलेला वाढदिवसाच्या कार्यक्रमात मामांचा सत्कार करताना बोलताना काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री विजयराव कोलते होते याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम दादा जगताप बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संभाजीराव होळकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील राव भगत हरिभाऊ भोंडवे माजी जि प सदस्य ज्ञानेश्वर बापू कवले डॉक्टर मनोज खोमणे बारामती मार्केट कमिटी ची माजी चेअरमन अनिल राव खलाटे युवा कार्यकर्ते सनी देवकाते पाटील पुणे जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रेय येळे माळेगाव कारखान्याचे माझी व्हाईस चेअरमन तानाजी कोकरे कामगार नेते अरविंद गायकवाड वकील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते स्वागत नंदकुमार मोरे यांनी केले या कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावातून अनेक मान्यवर कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.