
मुलीच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कोऱ्हाळे बु येथील ऊसतोड मजुरांच्या मुलांना कपडे व खाऊचे वाटप
Thursday, February 3, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील मच्छिंद्र दिवेकर यांनी त्यांची मुलगी व नंदू कोंढाळकर यांची नात आरोही हिच्या चौथ्या वाढदिवसाचा खर्च टाळून कोऱ्हाळे बु गावचे सरपंच रवींद्र खोमणे यांच्या हस्ते ऊसतोड मजुरांच्या मुलांना कपडे व खाऊचे वाटप केले आहे.
दिवेकर यांनी कोऱ्हाळे बु येथे ऊस तोड करण्यासाठी आलेल्या जवळपास 50 ऊसतोड मजुरांना हे कपडे व खाऊचे वाटप केले आहेत. सध्या अनेक पालक मुलांचा वाढदिवस हजारो रुपये खर्च करून धुमधडाक्यात साजरा करत आहेत. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून दिवेकर यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत या ऊसतोड मजुरांना कपडे व खाऊचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी कोऱ्हाळे बु गावचे सरपंच रवींद्र (सोन्याबापू) खोमणे), प्रवीण मुळीक(सर), भारत माळशिकारे, नंदू कोंढाळकर, सतीश यादव, संदीप सावंत, सुरेश खोमणे, किसन माळशिकारे, महेश चव्हाण, धनंजय जाधव, केशव माळशिकारे, दौलत माळशिकारे, बबन कोंढाळकर, गौरव यादव, सचिन कोंढाळकर, गिरीश कोंढाळकर उपस्थित होते.