-->
पोलिस असल्याचे सांगून वयोवृद्धांना लुबाडणाऱ्या लोकांपासून सावध राहा

पोलिस असल्याचे सांगून वयोवृद्धांना लुबाडणाऱ्या लोकांपासून सावध राहा

साधारणपणे सर्व शहरामध्ये मोठ्या गावांमध्ये काही लोक पोलिसा सारखा पेहराव करून डीबी पथकातील कर्मचाऱ्यांसारखा हेअर कट करून गॉगल किंवा खाकी पॅंट वापरून पोलीस असल्याचे वृद्ध लोकांना महिलांना सांगतात समोर नाकाबंदी चालू आहे त्यामुळे गळ्यातील दागिने काढून आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा खिशात ठेवा असे सांगून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने दागिने काढतात व हातचलाखी करून दागिने घेऊन पळून जातात. साधारणपणे हे लोक ज्या भागांमध्ये गर्दी विरळ आहे व वृद्ध दाम्पत्य एकटा जात असेल किंवा महिला एकटी जात असेल तर तिच्यासोबत हा प्रकार करतात. हे लोक गडबडून जातात व त्यामुळे चोरीचा प्रकार होतो. पोलीस दलातर्फे नाकाबंदी सुरू आहे दागिने काढून ठेवा. किंवा समोर दंगल चालू आहे आपले आपले दागिने काढून पैसे काढून खिशामध्ये ठेवा असे वृद्ध लोकांना सांगतात आणि वृद्ध लोक घाबरून दागिने आणि पैसे काढून ठेवतात त्याच वेळेस हे लोक हातचलाखी करतात
       साधारणपणे हे गुन्हे करणारे लोक इराणी टोळी असते. गोरेगाव ते तसेच पोलिसांसारखे दुष्ट पुष्ट शरीरयष्टीने असणारे लोक असतात तरी या प्रकारे कोणीही सीआयडी पोलिस दागिने काढण्यास सांगत नाही तरी याबाबत आपण सर्व लोकांना जनजागृती करावी. आपल्या जास्तीत जास्त ग्रुप वर हा मेसेज पाठवा
सुनील महाडिक
पोलीस निरीक्षक बारामती शहर

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article