
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर सुरू असणाऱ्या ईडी कारवाईमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, बारामती मार्फत दि.२५ रोजी भिगवण चौक येथे निषेध आंदोलन
Wednesday, February 23, 2022
Edit
मोरगाव : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचेवर ईडी मार्फत कार्यवाही सुरु आहे. या सुड बुद्धीने सुरु असलेल्या कार्यवाहीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मार्फत उद्या दि २५ रोजी निषेध आंदोलन केले जाणार आहे.
राज्याचे कॅबीनेट मंत्री नवाब मलीक यांवर ईडी मार्फत कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाहीस राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिव्र निषेध व्यक्त केला आहे. ही कार्यवाही जाणून-बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने व राजकीय सूडबुद्धीने केली जात आहे. तसेच आकसापोटी कारवाई सुरु आहे. याचा निषेध बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टींच्या पदाधीकारी व कार्यकर्त्यांकडुन केला जात आहे.
यासाठी शुक्रवार दि.२५ रोजी, सकाळी ११ वा. बारामती येथील भिगवण चौकात निषेध आंदोलन केले जाणार आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी माहिती दिली आहे.