-->
बारामती: जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील दुसऱ्या टप्यातील १०३ कोटी रक्कमेच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना मंजुरी; होळ, पाहूणेवाडी, गरदरवाडी, पिंपळी करंजेपुल योजनांचा समावेश

बारामती: जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील दुसऱ्या टप्यातील १०३ कोटी रक्कमेच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना मंजुरी; होळ, पाहूणेवाडी, गरदरवाडी, पिंपळी करंजेपुल योजनांचा समावेश

बारामती तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार सो व खासदार सौ . सुप्रियाताई सुळे सोो . यांच्या विशेष प्रयत्नांतुन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडुन रूपये १०३ कोटी रक्कमेच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री मा . ना . अजितदादा पवार सोो . यांचे संकल्पनेतुन या योजनांची आखणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत ( MJP ) करण्यात आलेली होती . यामध्ये १२ गावे ५८ वाडया / वस्त्यांचा हा आराखडा बनविण्यात आला होता . या योजनेसाठी पाटबंधारे विभागाकडील जागा साठवण तलाव , जलशुध्दीकरण केंद्र व उंच जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे . तसेच निरा - डावा कालवा मधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रितसर परवाना दिला आहे . तसेच या सर्व योजनांसाठी साठवण तलाव , मुख्य संतुलन पाणी टाकी , जलशुध्दीकरण केंद्र वितरण व्यवस्था , उंच जलकुंभ , पंपहाऊस इ . बाबी बरोबर सदरचे योजनेसाठी सौर उर्जाद्वारे विज उपलब्ध होणार आहे . त्यामुळे योजना विज देयकावरील ग्रामपंचायतीचा खर्च कमी प्रमाणात येणार आहे. या अगोदर ३३ ९ कोटी रूपयांच्या ६० गावांच्या ७ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली असुन उर्वरित ११० कोटी रूपयांच्या प्रादेशिक योजना प्रस्तावित पाणी पुरवठा खात्याकडे जमा केला आहे. अशी माहिती योजना समितीचे समन्वयक व बारामती तालुका पुनर्विलोकन व एकात्मिक विकास समन्वय समितीचे अध्यक्ष श्री संभाजी होळकर व बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ. निताताई फरांदे व श्री तन्मय कांबळे, उपअभियंता प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बारामती उपविभाग यांनी दिली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article