-->
श्री मोरया विकास सोसायटी पंचवार्षीक निवडणुकीत गणेश  मयुरेश्वर सर्वधर्म विकास पॅनलचे ९ उमेदवार विजयी

श्री मोरया विकास सोसायटी पंचवार्षीक निवडणुकीत गणेश मयुरेश्वर सर्वधर्म विकास पॅनलचे ९ उमेदवार विजयी

मोरगाव : मोरगाव ता. बारामती येथील  श्री मोरया विकास सोसायटी पंचवार्षीक  निवडणूक आज संपन्न झाली.  यामध्ये १३ जागा बिनविरोध झाल्या. यापैकी माजी सरपंच  पोपट तावरे  यांच्या  श्री  गणेश  मयुरेश्वर सर्वधर्म  विकास पॅनलचे  ९ उमेदवार आहेत.
बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध विकास कार्यकारी  सोसायटीचे बिगुल वाजले असून गावोगावी निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे. अनेक गावातील  शेतकऱ्यांनी अभी नही तो कभी नही भूमिका घेतली आहे . मोरगाव येथील श्री मोरया विविध कार्यकारी सेवा  संस्थाची निवडणूक प्रक्रीया आज संपन्न झाली. येथील सर्व जागा बिनविरोध करून  तालुक्यात एक वेगळा आदर्श  निर्माण केला आहे. बिनविरोध झालेल्या जागेपैकी  सर्वसाधारण गटातून  सुनील दत्तात्रय तावरे, संजय प्रभाकर तावरे, गोरख दिनकर सणस, चंद्रकांत हरीदास नेवसे, सुशिल सिद्राम तावरे, नितीन पोपट तावरे,  पोपट काशीनाथ तावरे, पोपट श्रीमंत ढोले यांची बिनविरोध निवड झाली.

तर इतरमागास प्रवर्गातुन नवनाथ रामचंद्र नेवसे, भटक्या विमुक्त जाती जमातीतून एकनाथ विठोबा थोरात, अनुसूचित जाती जमातीतुन शिवदास दिगांबर गायकवाड , महीला प्रतीनिधीतुन मनिषा बाबा पालवे व मंदाकिनी मारुती तावरे यांची बिनविरोध निवड झाली. यासर्व  उमेदवारांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, संचालक मंडळाकडुन शेतकऱ्यांच्या हिताचे अधीकाधीक निर्णय घेणार आहे .

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article