
एक दुःख बाजुला होईपर्यंत दुसरे दुःख दारी; एकीकडे पत्नीचे निधन; अंत्यविधीसाठी गावाला आले तर इकडे १५ तोळे सोनं चोरट्यांनी केले लंपास
Saturday, February 26, 2022
Edit
मोरगाव : तरडोली ता. बारामती येथील शिवाजी गुलाब कदम यांच्या पत्नीचे दि.१९ रोजी निधन झाले. व्यवसाया निमित्ताने ते लोणी काळभोर येथे राहत होते. पत्नीच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी ते गावी आले असता चोरट्यांनी डाव ठेऊन तब्बल पंधरा तोळे सोने लंपास केले असुन कदम कुटुंबीयांवरील एक दुख : बाजुला होईपर्यंत दुसरे दत्त म्हणून आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तरडोली येथील शिवाजी कदम हे व्यवसायानिमीत्ताने लोणी काळभोर नजीक कदमवाक् वस्ती येथील स्वामी कुंज सोसायटीमध्ये राहत आहेत. त्यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने पुढील विधीसाठी सर्व कुटुंब तरडोली येथे आले होते. दरम्यान दि २४ रोजी सोसायटीमध्ये राहणारे विशाल पवार यांनी कदम यांना मोबाईल करुन तुमच्या फ्लॅटवर कोणी आले आहे का दरवाजा उघडा दिसत आहे अशी माहीती दिली.
कदम यांच्या कदमवाकवस्ती येथील घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून कर्णफुले, गंठण, बांगड्या, अंगठी, लक्ष्मीचे चित्र असलेले सोन्याचे शिक्के असे एकूण 15 तोळे सोन्याची चोरी झाली. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कदम कुटुंबीयांवर एक दुख: बाजुला होईपर्यंत दुसरे आले असल्याने परीसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.