
मयुरेश्वर मोरगाव मंदिरात गणेश जयंती निमित्ताने हजारो भावीकांची मंदीयाळी
Friday, February 4, 2022
Edit
मोरगाव : मोरगाव ता . बारामती येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदीरात आज गणेश जयंती निमित्ताने भावीकांनी गर्दी केली होती . माघ उत्सवाचा आजचा चौथा दिवस असुन द्वार यात्रेची सांगता व गणेश जयंती निमित्ताने राज्यभरातील हजारो भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले असल्याची माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथील माघी यात्रा उत्सव सुरु आहे . या यात्रेच्या निमित्ताने सर्व धर्मीयांना माघ शुद्ध प्रतीपदा ते माघ शुद्ध पंचमी या काळात मयुरेश्वराच्या मुख्य मुर्ती गाभाऱ्यात जाऊन श्रींची स्वहस्ते पुजा व जलाभिषेक करता येतो. मात्र कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडुन परवानगी नाकारली आहे . यामुळे उत्सव काळात मुक्तद्वार दर्शानाचा लाभ घेता येत नाही . मात्र भावीकांना यात्रा काळात नियमित दर्शन घेता येत असल्याने गणेश जयंती निमित्ताने राज्यभरातून भाविकांनी मोरगांव येथे गर्दी केली होती .
काल दि . ३ रोजी माघी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य पट्टाधीकारी मंदार देव महाराज चिंचवड येथून मोरया गोसावी प्राप्त मंगलमुर्तीची स्वारी घेऊन रात्री सात वाजता आले . यावेळी मंगलमुर्तीचे स्वागत स्थानिक विश्वस्त विनोद पवार , विश्वस्त विश्राम देव , राजेंद्र उमाप , मोरगावचे सरपंच निलेश केदारी व ग्रामस्थांनी केले. मंगलमुर्तीची स्वारी मंदीरात गेल्यानंतर मंगलमुर्ती व मयुरेश्वर देवता यांचा भेट सोहळा संपन्न झाला . यानंतर आरती , नैवद्य विविध धार्मिक विधी संपन्न झाले . आज गणेश जयंती निमित्ताने पहाटे पाच वाजता गुरव मंडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर भावीकांना श्रींच्या दर्शनासाठी मुख्य दरवाजा खुला करण्यात आला .
ऱाज्यभरातील भावीकांची दिवसभर भावीकांची मंदीयाली सुरु होती . आज गणेश जयंती निमित्ताने महापुजा , नैवद्य , तर रात्री १० वाजता श्रींचा पालखी छबिना , खिरापत वाटप हा कार्यक्रम संपन्न झाला . श्रींस शेंदुर लेपन (शेंदुरपुडा ) झाल्यानंतर रात्रभर श्रीमन् महासाधू मोरया गोसावी पदे , आरती , आदी कार्यक्रम संपन्न झाले .